आय एम सॉरी विराट सर.. नवीन उल हकनं मागितली कोहलीची माफी? ट्वीट चर्चेत
2214 views
क्रीडा चे व्हिडिओ सबस्क्राईब कराआयपीएलच्या १६ व्या मोसमात क्रिकेट विश्वाला अनेक स्टार खेळाडू मिळाले. मात्र यावर्षीच्या हंगामात खेळाडूंच्या खेळाइतकीच मैदानावरील स्पर्धांमधील टशन देखील तितकीच रंगली. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात 1 मे रोजी सामना खेळवण्यात आला. या सामन्यानंतर नवीन उल हक याच्यावरुन गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात झालेला वाद चांगलाच गाजला. यानंतर सोशल मीडियावर देखील या दोघांमध्ये शीतयुद्ध सुरु झालं. यात फॅन्सची उडी घेतली अन् नवीन उल हकला प्रत्येक मॅचमध्ये कोहलीच्या नावानं डिवचण्यात येत होतं.प्लेऑफ एलिमिनेटरमध्ये बुधवारी 24 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स भिडले. मुंबई इंडियन्सने या सामन्यात लखनऊवर 81 धावांनी विजय मिळवला. या पराभवासह लखनऊचा प्रवास इथेच संपला. या सामन्यानंतर नवीनने विराटची माफी मागितल्याचं ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झालंय.