डिझेल भरायला पैसे नव्हते, रुग्णवाहिका तब्बल एक तास पंपावर अडकली; गर्भवती महिलेला वेदना असह्य
1066 views
चंद्रपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करारुग्णवाहिकेत डिझेल भरायला आरोग्य विभागाकडे पैसेच नव्हते म्हणून रुग्णवाहिका पेट्रोलपंपावर खोळंबल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोग्य व्यवस्थेची पोलखोल करणारा हा प्रसंग चंद्रपुरात घडली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथिल मोनिका तांगडपलेवार या गर्भवती महिलेला त्रास जाणवायला लागला. जास्तच त्रास जाणवू लागल्यानं लवकर उपचार मिळावेत यासाठी मोनिका रामदास तांगडपलेवार हिला चंद्रपूरच्या रुग्णलयात रुग्णवाहिकेतून नेण्यात येत होतं. गोंडपिपरी येथिल पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी थांबली असता गोंधळ झाला. डिझेल भरण्यासाठी चक्क पैसे नसल्यानं पैशांची जुळवाजुळ करण्यासाठी तब्बल एक तास ही रुग्णवाहिका पंपावरच खोळंबली. त्यामुळे गर्भवती महिलेला असह्य वेदना होत असतानाही रुगणवाहिकेतच ताटकळत राहावं लागलं. अखेर तालुका वैधकीय अधिकारी डॉ.दिनेश चकोले यांनी पैशाची व्यवस्था केल्यानंतर रुग्णवाहिका चंद्रपूरसाठी रवाना झाली. जननी सुरक्षा योजना,जननी शिशु सुरक्षा योजना अशा अनेक योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध असतांना रुग्णवाहिकेला डिझेल अभावी गर्भवती महिलेचा जीव आरोग्य विभागाने धोक्यात टाकणं कितपत योग्य आहे असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बरं याबाबत अधिकाऱ्यांना विचारलं असता आर्थिक व्यवहारासंबंधी कनिष्ठ लिपिक पद रिक्त असल्यानं व पंचायत समिती स्तरावर बिल रखडलं असल्याने हा सगळा प्रकार घडल्याची माहिती मिळाली.